Letting falsehood spread is no virtue
 
असत्याचा प्रसार होऊ देणं हा काही गुण नव्हे

ह्या मर्यादांच्या बाबतीत हिंदु फारसे चिकित्सक नसतात. कारण, त्यांना कोणत्याही मार्गाचं वावडं नसतं. चित्तत्वाच्या प्राप्तीला जो मार्ग सहायक ठरेल अशा कोणत्या मार्गाचं त्यांना वावडं नसतं. पण ह्या रिलिजनाची मनोवृत्ती अशी नसते.

“गेल्या १,००० वर्षांत भारतीयांचा इतका का छळ होत गेला? सामान्यतः ते स्वभावानं सज्जन असून त्यांना कुणावरही कधी आक्रमण केलं नाही, म्हणून का?” असं कुणी तरी सद्गुरु जग्गी वासुदेवांना विचारलं. ह्या प्रश्नानं मलाही कमालीचं सतावलं. “त्यांनी आपल्या शत्रूंना ओळखण्याचा कधी प्रयत्न च केला नाही” असं उत्तर सद्गुरूंनी दिलं.

उदाहरणार्थ, महमद घोरीनं युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाहीत, तरी पृथ्वीराज चव्हाणानं त्याला कैकदा पकडूनही सोडून दिलं. पण, त्या तरुण भारतीय राजानं आक्रमक महमद घोरीच्या त्या तत्त्वहीन वर्तनाचा कधीही अभ्यास केला नाही. स्वतःच्या हिंदु धर्मापेक्षा इस्लामच्या वेगळेपणाची त्याला कधी कल्पनाच आली नाही.

ह्या परिस्थितीत आजही काही बदल झाला आहे, असं नाही. नेमका धोका कशामुळं आहे, ते स्वामी विवेकानंद किंवा श्री अरविंद ह्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही तशीच परिस्थिती टिकून आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, “जेव्हा कोणीही हिंदु व्यक्ती हिंदुत्व सोडून देते, तेव्हा केवळ एक हिंदु कमी होतो, असं नव्हे, तर एक शत्रु वाढतो,” असं स्वा. विवेकानंदांनी सांगितलं होत.

एखादा रिलिजन लोकांना शत्रुत्वाची प्रेरणा देऊ शकतो काय? ह्याची आणखी चिकित्सा करायला हवी आहे.

एकीकडे हिंदु धर्म आणि दुसरीकडे इस्लाम अथवा ख्रिश्चनता ह्यांच्यांत पराकोटीचं वेगळेपण आहे. ते किती आहे, त्याचीही आपल्याला काही कल्पना नाही. त्याचंही आपण विश्लेषण करायला हवं आहे. आणि ते निर्भयपणं मांडायलाही हवं आहे. मानवतेच्या कल्याणाकरता तर त्याची नितांत आवश्यकता आहे.

पहिली बाब अशी:

महान हिंदु संस्कृतीकरता अतिप्राचीन हिंदु धर्माचा आणि त्याच्या मुळांचा विचार केला पाहिजे. ख्रिश्चनता आणि इस्लाम अगदी अलीकडचे आहेत. त्यांनी अत्यंत क्रूरपणं त्या प्राचीन सर्वांचा विनाश तर केला आहेच. वर अंधश्रद्धांची वाढ केली आहे.

इन्का, माया, आझती, इजिप्त, वाबिलोन, ग्रीस. पर्शिया, अफगाणिस्तान ह्या साऱ्या संस्कृती विलयास तर गेल्याच. उलट त्यांचा इतिहास विकृत करण्यात आला. आज ज्यांना पाकिस्तान आणि बांगलादेश म्हटलं जातं, तेथील हिंदु संस्कृतीसुद्धा विलय पावली. भारतालासुद्धा मोठी झळ पोचलीच. लक्षावधींचा संहार झाला. आणि ज्ञानसंपत्तीही अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडून नाहीशी झाली. कारण, अगणित ग्रंथांची राखरांगोळी झाली.

पण रिलिजनमुळं मानवसमाजाला काही लाभ व्हावा असं वाटत नाही का? ईश्वर, आपल्या आणि एकूणच मनुष्यांच्या अस्तित्वामागील उद्देश, आणि त्या परतत्त्वाशी मानवाचा संबंध ह्यासाठीच रिलिजन असतात ना? त्या परतत्त्वाची पूजाअर्चा करणे, त्याला शरण जाणे ह्यासाठीच विविध रिलिजन उदयाला आले ना? स्वतःच्या इच्छेनुसार रिलिजनची निवड करण्याचा हक्क घटनेनं दिला आहे, आणि तो हक्क राष्ट्रसंघानं पुरस्कारलाही आहे ना? मग हे क्रौर्य कशाकरता? कुठं चुकलं?

खरं तर हे अगदी स्पष्ट आहे. पण ते कुणालाच पाहण्याची इच्छा नाही. “परमेश्वराची इच्छा,” ह्या अतर्क्य तत्त्वांवर श्रद्धा असलीच पाहिजे अशी सक्ती रिलिजनांत आहे, हे खरं कारण आहे. आरंभी त्यासाठी बळाच्या आणि रक्तपाताच्या मार्गांचा अवलंब. नंतर बालकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रकार, तसं न केल्यास, शंका विचारल्यास, टीका केल्यास, किंवा त्या रिलिजनचा त्याग केल्यास कठोर शिक्षांचा अवलंब शतकानुशतकं झाला. त्यामुळं शतकानुशतकं  ते रिलिजन मानणाऱ्यांची संख्या फुगत गेली. वर, काय चुकतंय ते ज्या काही फार थोड्या जणांनी लक्षात आणून दिलं, त्यांच्याच जिवाला धोका निर्माण झाला. त्या रिलिजनांनी आपापल्या विरोधकांचा संहार केला.

काय चुकलं ते स्पष्ट होण्याकरता भूतकाळात जाऊन निरीक्षण करून पाह्यला हवं.

अतिप्राचीन वेदांना विश्वाच्या उत्पत्तीचं, आपल्या अस्तित्वामागच्या कारणांचं ज्ञान होतं. अशा वेदांनी त्या महान शक्तीचं (त्याला त्यांनी ब्रह्म म्हटलं) अस्तित्व मानलं. त्याच्यातून सर्व विश्व प्रकटलं आणि त्यानं सर्वत्रच आपलं अस्तित्व दाखवलं. म्हणजे हे ब्रह्म आपल्या आत आहे. या नावाच्या शक्तीमुळं आपल्या विचारांनी आणि मनाच्या इतर कार्यामुळं ते झाकोळलं आहे. प्राचीन ऋषींनी विश्वनिर्मितीचं योग्य विश्लेषण केलं आणि आपल्या अस्तित्वामागील त्या सुप्त शक्तीचा म्हणजे देवाचा, शोध घेतला. अणुमध्येच त्यांनी ब्रह्मांड पाहिलं. त्यांतून ते विश्वापर्यंत झेप घेऊ शकले, ते त्यांनी स्वतःला अंतर्मुख केल्यामुळं, आपल्या अंतरंगातच खोल बुडी मारून. तपश्चर्या करून शोध घेतल्यामुळं त्यांना ते साधलं. त्यांतून त्यांनी विश्वातीलंच पूर्वीपासून उपलब्ध असलेलं सुप्त उदात्त ज्ञान अखिल विश्वाच्या कल्याणाकरता आणि भावी पिढ्यांकरता उपलब्ध करून दिलं.

प्राचीन काळात जगाच्या मोठ्या क्षेत्रावर भारतीय संस्कृतिसभ्यतांनी फार मोठा प्रभाव गाजवला असल्याचे पुष्कळ पुरावे मिळतात. त्या एका ब्रह्मतत्त्वाचीच रूपं म्हणून, विविध पूजाअर्चा निरनिराळ्या प्रकारांनी करता यावी, म्हणून नाना प्रकारच्या देवतांची निर्मिती त्यांनी केली ह्याचेही लक्षावदी वर्षांच्या इतिहासाचे पुरावे भारतीय ग्रंथांतून सापडतात (त्यासाठीत भारतीय वाङ्मयाकडे गंभीरपणं लक्ष देण्याची आवश्यकता आहे). पुन्हा त्या विविध मार्गात कसल्याही प्रकारानं संघर्षाचा गंधही नाही. ते सर्व एकाच ठिकाणी सलोख्यानं, समाधानानं वास्तव्य करून राहिले, त्यातल्या कुणीही आपलाच मार्ग सत्य असल्याचा, म्हणून सर्वांनी त्याचा मार्गाचा अवलंब करा असा आग्रहसुद्धा धरला नाही.

त्यात बदल सम्राट अशोकानं घडवला. आपल्या राज्यातील प्रत्येकानं भारतीय संत गौतम बुद्धाचाच मार्ग स्वीकारला पाहिजे, असा आग्रह त्यानं धरला. बुद्धाचं महानिर्वाण अशोकाच्या जन्माच्या कितीतरी काळ आधी झालं होतं. पण, बुद्धाच्या वचनांतून काही एक मार्ग निर्माण करून अशोकाच्या प्रजेनं त्याच मार्गानं जावं अशी अपेक्षा केली गेली. त्यासाठी अशोकानं देशोदेशी  प्रचारकही पाठवले.

म्हणजे ब्रह्मप्राप्तीसाठी आपल्याला आवडेल त्या मार्गानं जाण्याचं स्वातंत्र्य जिच्यात होतं ती परंपराच अशोकानं मोडीत काढली. आणि बुद्धानं दाखवलेलाच मार्ग सर्वश्रेष्ठ असल्याचं ठरवलं. त्याला पुढं ब्रिटिशांनी बौद्ध धर्म हे नाव दिलं. जो कोणी दूर जातो, आणि निराळ्या मार्गाचा अवलंब करतो, त्याला स्वाभाविकतः आपण निवडलेला नवा मार्गच आधीच्या मार्गांहून श्रेष्ठ असल्याचं म्हणावं लागतं. आणि त्याचं म्हणणं इतरांना पटलं नाही, तर इतरांनीही त्याच मार्गानं जाण्याकरता सक्तीही करावी लागते. नंतरच्या काळात आद्य शंकराचार्यांनी त्याला वादांतून आव्हान दिलं आणि बहुतेक हिंदू कमी पोथीनिष्ठ असलेल्या आपल्या पूर्वीच्या धर्मात परतले.

दरम्यानच्या काळात, भारतापासून पुष्कळ दूर असलेल्या प्रदेशात आणि अदमासे १७०० वर्षांपूर्वी रोमन सम्राटानं एका ख्रिस्ती रिलिजनला राज्य-धर्म करण्याचं ठरवलं. सर्वांचा रिलिजन एकच असला तर त्याचे काही लाभ मिळतील अशी त्याची कल्पना होती. थोडक्यात, ज्या कुणा देवदूताची ज्यू लोक वाट पाहात होते, तो जीझस नावानं आलाच होता. पण, त्याला कुणी ओळखलं नाही. आणि ज्यूंनी त्याला ठार मारलं.

तरीही, ह्या पंथाच्या प्रभावी आणि हिंस्र वृत्तीचं दर्शन झालं. कारण त्याला राज्याचा पाठिंबा लाभला होता. त्यांनी अस्तित्वात असलेली मंदिरं पाडली, ग्रंथ जाळले आणि इजिप्तमधील सुप्रसिद्ध महिला तत्त्वज्ञा हिपाशिया (Hypatia) हिलाही ठार मारलं. लवकरच, स्थानिकांवर सक्ती होऊन मध्य आशियात, उत्तर आफ्रिकेत आणि युरोपात ख्रिश्चनतेचा प्रसार झाला.

ते इतके असहिष्णु का असावेत? खऱ्या महान ईश्वरानं, स्वर्गाच्या पित्यानं, आता (म्हणजे २००० वर्षांपूर्वी) आपला मुलगा जीझस ख्राइस्टला मानव समाजाला पापापासून वाचवण्याकरता पाठवलं असून सर्वांनी त्याच्या सांगण्याचंच अनुसरण केलं पाहिजे. आणि जीझसनं काय म्हटलं? सर्वांनी आपण सांगतो त्या मार्गाचा अवलंब केला तरच त्यांना त्या पित्याकडे जाता येईल, असा दावा त्यांनं केला. मृत्यूनंतर नरकग्नीत जळण्यापासून वाचायचं तर जीझसवर श्रद्धा ठेवणं अत्यावश्यक आहे, असा दावा चर्चनं केला.

काही शतकानंतर ह्याच कथेची पुनरावृत्ती घडून आली: सातव्या शतकात, खऱ्या देवानं म्हणजे अल्लानं गाब्रिएल नावाच्या देवदूतामार्फत आपल्याला जे सांगितलं, त्याचं अनुसरण प्रत्येकानं केलंच पाहिजे, असं महमद नावाच्या एका अरब व्यक्तीनं सांगितलं. आणि मनुष्यांनी काय करायला हवं, त्याविषयी अल्लानं काय सांगितलं? सर्वांनी शेवटचा प्रेषित असलेल्या महमदावर श्रद्धा ठेवलीच पाहिजे. कारण, अल्लानं आपल्याला (महमदाला) स्वतःची इच्छा सांगितली आहे, तसा निरोप आपल्या मार्फत अल्लानं सर्वांना दिला आहे. ती त्याची सर्वांत महत्त्वाची इच्छा आहे. जोवर सर्व लोक आपल्यावर श्रद्धा ठेवीत नाहीत, तोवर आपल्या अनुयायांनी लढलं (जिहाद केला ) पाहिजे. आणि जे विरोध करतील त्यांना अंतिमतः मृत्यूनंतर भीषण अशा नरकाग्नीत सतत जळत राहावं लागेल, असा धाकही घातला आहे.

लढायचं कसं ते महमदनं स्वतःच दाखवलं आहे. उदाहरणार्थ, त्यानं ज्यूंच्या टोळ्यांवर हल्ला केला. आण पुरुष शरण आले तरी त्यानं त्यांचा संहार केला, त्यांच्या स्त्रियांना वेश्याकामाकरता गुलाम म्हणून म्हणून पकडून नेलं. त्यांच्या मिळकती लुटल्या. त्याच्या मृत्यूनंतर, अनुयायांनी मध्यपूर्वेकडे, उत्तर आप्रिकेकडे, स्पेनकडे आणि युरोपच्या काही प्रदेशांकडे मोर्चा वळवला. आणि ज्यांना पूर्वी सक्तीनं ख्रिस्ती बनवण्यात आलं होतं, त्यांना सक्तीनं मुस्लीम बनवण्यात आलं. ह्या कार्यात अतोनात रक्तपात झाला आणि ते त्यांतील क्रौर्यामुळं कमालीचं “यशस्वीही” झालं.

मुस्लीम आक्रमकांनी तर भारतालाही सोडलं नाही. तिथंही जिहादच्या नावानं त्यांनी रक्तपात घडवला. पण. इथं त्यांना प्राचीन संस्कृतीचा नाश करता आला नाही. कारण ह्या नवीन पंथांची पात्रता मूळच्या धर्माच्या पासंगालाही पुरण्यासारखी नव्हती. मात्र, त्यांनी अतुलनीय क्रौर्य घडवलं. मुस्लीम आक्रमक भारतीय समाजात खोलवर घुसले, त्यातून कित्येक हिंदूंना बाटवण्यात आलं. नंतरच्या काळात पुन्हा, पोर्तुगीजांनी आणि ब्रिटिशांनी ख्रिश्चनतेचा प्रसारही अशाच पद्धतीनं केला.

तसं कशाला? आजसुद्धा, म्हणजे स्वतंत्र भारतातही, ख्रिश्चन आणि मुस्लीमांनी हिंदु संस्कृती नष्ट करणयाचे प्रयत्न थांबवलेले नाहीत. वेगळ्या प्रकारची चर्चं आपलं काम अति वेगानं करीत आहेत. त्यासाठी पैशाचाही ओघ वाहवत आहेत. दुःखाची बाब म्हणजे त्यांना जोशुआसारख्या प्रकल्पांतून यशही लाभत आहे. इस्लाम, हीच बाब, आपली संतती वाढवून, लव जिहादसारख्या कार्यातून, करीत आहे. पुन्हा तसाच प्रयत्न हिंदुत्वाहून किंवा ख्रिश्चनतेहून इस्लाम कसा वरचढ आहे, असं पटवून देण्याचा प्रयत्न करीत त्यांचं काम चालू आहे. हिंदू लोक, माकडांची, उंदरांची पूजा करतात, असे सांगत तो प्रयत्न चालूही असतो. ह्या प्रयत्नांना विरोध करायचा तर क्रूरपणं ठार मारलं जाण्याचा धोका पत्करूनच तसा विरोध करावा लागतो.

इस्लाम आणि ख्रिश्चनता दोन्ही रिलिजन इतरांना धोकादायक असल्याचं कित्येक शतकांच्या इतिहासातून तर प्रस्थापितच झालं आहे. विशेषतः त्या त्या रिलिजनातीलच ज्यांना त्यातील बाबी पटत नाहीत, आणि जे त्यांबद्दल शंका घेतात, त्यांनाही धोका असतोच. त्यातही, त्या त्या पंथांतील जी मंडळी त्यांच्या पंथांवर निष्ठा ठेवीत नाहीत, अशा लक्षावधी, नव्हे कोट्यवधी लोकांचा इस्लामियांनी आणि ख्रिश्चनांनी संहारही केला.

आजमितीस भारतामध्ये २० कोटी मुसलमान आहेत. आणि बहुधा ४ कोटीहून अधिक ख्रिश्चन असावेत. कारण, मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ चालू राहण्याकरता ख्रिस्ती झालेले लोक कागदोपत्री आपलं हिंदु नावच चालू ठेवतात. स्वामी विवेकानंद म्हणाले, त्याप्रमाणे हे लोक भारताचे शत्रु असतील का?

शत्रु हा काहीसा कठोर शब्द आहे. तरीही ख्रिस्ती होऊन बाटलेले हिंदु, त्यांना जसं शिकवलं जातं तसं हिंदूंना हीन लेखतात. ते शिक्षण त्यांच्या मनातच इतकं भिनलं आहे की, ते खऱ्या ईश्वराला मानत नाहीत. माझ्या बालपणात प्रॉटेस्टंटांना आम्ही कॅथॉलिक पंथीय हीन लेखीत होतो. आम्ही कॅथॉलिकच बरोबर असून इतर सगळे आम्हाला चुकीचे वाटत. कारण, पाखंडी ठार चुकीचेच असतात.

1980 च्या दशकात काही काळ मी शांतिवन नावाच्या ख्रिस्ती आश्रमात घालवला होता. परदेशीयांशी ते उदारपणं वागत. आणि आम्ही हिंदु आणि बौद्धांशी मित्रत्वानं वागत असू. तरीही, एकदा बेड ग्रिफिथ (Bede Griffiths) नावाच्या एके बेनेडिक्टाईन पंथीयाचं एका नव्या ननशी झालेलं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. आपल्याकडेच खरं सत्य आहे, असं तो तिला सांगत होता. नंतर मी त्याला एक प्रश्न केला तेव्हा, “मला त्यांच्या समजुती पक्क्या करायलाच हव्यात, कारण हिंदुत्वाच्या मर्यादा त्यांना समजायला हव्यात,” असं त्याचं उत्तर!

ह्या मर्यादांच्या बाबतीत हिंदु फारसे चिकित्सक नसतात. कारण, त्यांना कोणत्याही मार्गाचं वावडं नसतं. चित्तत्वाच्या प्राप्तीला जो मार्ग सहायक ठरेल अशा कोणत्या मार्गाचं त्यांना वावडं नसतं. पण ह्या रिलिजनाची मनोवृत्ती अशी नसते. आपल्या मर्यादा टिकण्याकरता ती आवश्यक असते. पण, सामान्यतः हिंदूंना त्यांच्या असल्या वृत्ती कळत नाहीत. त्यांची अपेक्षा माणसांनी सामान्य बुद्धीचा उपयोग करावा, आणि त्यामुळंच जर आपण ख्रिश्चन रिलिजनचा स्वीकार केला नाही तर मरणोत्तर नरकाग्नीत जळावं लागेल, ही कल्पना ते गांभीर्यानं घेत नाहीत. असलं खुळचट सांगणंही फारशा गांभीर्यानं ते घेत नाहीत.

पण, ते चुकत आहेत. पुष्कळांचा त्यावर विश्वास आहे. असा विश्वास धोक्याचा आणि समाजात भेदभावास कारण होय. त्यातून अपराधांमध्ये वाढ होते. मुळात त्या सांगण्याला तर्काचा कसलाही आधार नाही. आणि तसा आधार देणं अशक्यही आहे. असली धोकादायक श्रद्धा हटवायला हवी. आणि बालकांना तर ती मुळीच शिकवता कामा नये.

इथं हिंदु आपल्या कर्तव्याला चुकले, आणि अजूनही चुकत आहेत. ते बाह्यतः निरुपद्रवी वाटत असेल. सर्वांना त्यावर विश्वास ठेवायला लावणं धर्मनिरपेक्ष वाटेल. पण ही प्रवृत्ती मूर्खपणाची असून ती आपल्या अस्तित्वालाच आव्हान देत असते.

गेले काही शतकं ख्रिश्चनांनी अद्धावानांना ठार करण्याचं थांबवलं आहे. पण, मुस्लीमांनी अजून तसं केलं नाही. सातत्यानं तसला प्रकार चालूच आहे. आपण करीत आहोत, ते रास्तच आहे, असं मुस्लीम आतंकवाद्यांना प्रामाणिकपणं वाटत आहे. तसं केल्यामुळं आपल्याला स्वर्गातही वरची जागा मिळेल, अशीही त्यांची समजूत आहे (कुराण ४-९५) जर एखाद्या तरुणाची अशी प्रामाणिक धारणा नसती तर आत्मघाती हल्ले करून काफिरांना ठार करायला तो कसा उद्युक्त झाला असता?

ही परिस्थिती चिंताजनक आहे. भाविक ख्रिश्चन हिंदूंना हीन मानतात हे वाईट आहे. पण, धार्मिक मुस्लीम तेवढ्यावर न थांबता होय आम्ही ते खोटं असलं तरी मानतो (तकिया), असं ते स्पष्ट सांगायलाही मागंपुढं पाहात नाहीत. तसं वागलं तरी त्यांची सदसद्विवेक बुद्धीही त्यांना टोचत नाही. त्यामुळं ते आपल्याला ठार करायला किंवा आपली काही तरी हानी घडवायलाही सिद्ध असतात. कुराणातील ५-३२ हे वचन कुणा एकालाही ठार मारायला बंदी घालीत असलं तरी ते डोळ्यांत धूळ फेकणारं आहे. पहिलं कारण, ज्यूंच्या पाठ्यपुस्तकात अल्ला ज्यू बालकांना उद्देशून बोलतो, अशी माहिती आहे. एखाद्यानं काही अपराध केला तर त्याला मारायला अडचण नाही. आणि दुसरं, “श्रद्धा” असणाऱ्यांच्या दृष्टीनं अल्लावर आणि त्या प्रेषितावर श्रद्धा नसण्याहून अधिक मोठा अपराध कोणता?

सुदैवानं रिलिजनवरील विश्वास उडालेले कित्येकजण आहेत. विशेषतः, अशी शिक्षा होत नसल्याचं ध्यानात आल्यावर ख्रिश्चनांनी चर्चचा त्याग केल्याचं दिसू लागलं.  पुष्कळ मुस्लीमांनाही शंका येऊ लागल्या आत. माझ्या नुकताच परिचय झालेल्या एकानं मला सांगतलं, ईश्वर न मानणाऱ्यांची संख्या अगदी सौदी अरेबियातही १० टक्के आहे. इस्लाम सोडलेल्या कित्येकांनी महाजालावर व्हिडिओही सादर केले आहेत. ते मुक्तपणं त्या श्रद्धांवर टीका करू लागले आहेत. त्यांना ते धोकादायक आहेच. त्यांच्यावर सामाजिक आणि कौटुंबिक दबावही कमी नाही. आणि त्यांच्या काही कुटुंबांतही त्यांना ठार करू इच्छिणारे आहेत. धर्मत्यागाचा अपराध मृत्युदंडास पात्र ठरवलेलेही अनेक देश आहेत.

उलट, हिंदुसुद्धा आपलं कर्तव्य करीत नाहीत. पोथीनिष्ठ रिलिजनचा त्याग केलेल्यांना ते आधार देत नाहीत. त्यापक्षाही वाईट म्हणजे आपापल्या रिलिजनांतच राहावं, ह्याला सरकारंही उत्तेजन देत आहेत. आणि उलट, त्यांना अल्पसंख्य म्हणून सवलती देत आहेत.

काय करता येईल, त्याचा आपण सर्वजण विचार करूया. एक बाब अत्यावश्यक आहेच. आपण, अगदी प्रामाणिकपणं ख्रिश्चन आणि इस्लाम रिलिजनांतील घातक अंगं उघड करायला हवीत. कारण, ह्या दोघांचाही हेतु हिंदुत्व नाहीसं करणं हाच आहे.

महाशक्तीची पूजा करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. रिलिजन-स्वातंत्र्य म्हणून तो अधिकार आहे. ते चागलंच आहे. ह्या विश्वाच्या मागं कोणती तरी सर्वशक्तिमान तत्त्व आहे. पण, ती सर्वोच्च शक्ती काहींनाच संरक्षण देते आणि त्याच्यावर श्रद्धा नसलेल्यांना देत नाही, असा निराधार दावा करण्याचा कुणालाही हक्क नाही. आणि न मानणारेही बहुसंख्य असून त्या सर्वांना मरणोत्तर नरकाग्नीत जाळलं जाईल, आणि केवळ काही व्यक्तींनाच (त्या दोन) महाशक्तीनं अंतरिम सत्य सागितलं आहे, हे प्रतिपादनही निराधार असून निरर्थक आहे. त्याच्यामुळंच मानवजातीला भयानक दुःख भोगावं लागलं.

आपण परिपूर्ण असल्याचा एकाच व्यक्तीचा दावा असणं, आणि सर्वांनी त्याचंच अनुसरण करावं, असा हट्ट करणं, सत्य नाही, हे स्पष्ट आहे. जिवाच्या भीतीनं हिंदु ह्या दाव्याचा प्रतिवाद करू शकले नाहीत. पण, आता हळू हळू हिंदूंना ते कळून चुकलं आहे. पुष्कळांना आपल्या संपन्न प्राचीन वारशाची जाणीवही झाली आहे. आणि आपली फसगत झाली असून असल्या निरर्थक सांगण्यावर विश्वास ठेवण्याचा काही उपयोग नाही, ह्याचीही जाणीव झाली आहे.

आपल्या वारशाचा आदर झाला पाहिजे आणि तो भारतभरच्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे, नव्हे सर्व जगभरच्या विद्यार्थ्यांनाही शिकवला पाहिजे, हे ठासून सांगण्याचं धाडसही ते दाखवतील का? ऋषींनी अंतःप्रेरणेतून मिळवलेलं ज्ञान कसोट्यांवर उतरलं असल्याचं आणि ते कधीही असत्य असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. त्यानं विज्ञानाला स्फूर्तिही दिली आहे आणि समाजात सुसंवाद कसा असावा हेही सांगितलं आहे. अकारण असत्याचा बोलबाला होऊ देणं हा काही गुण नव्हे.

The article has been translated from English into Marathi by Professor Manohar Railkar

Featured Image: Zee News

Disclaimer: The facts and opinions expressed within this article are the personal opinions of the author. IndiaFacts does not assume any responsibility or liability for the accuracy, completeness,suitability,or validity of any information in this article.