The article has been translated into Marathi by Professor Manohar Railkar
कुणाचा कुणावर प्रभाव पडतो, ते कित्येकदा मला कळत नाही. भारतीय वृत्त विभागाचा परदेशी वृत्तविश्वावर प्रभाव पडतो की उलट होतं. कारण, बघावं तो, दोघांचा दृष्टिकोण इतका सारखा! तो कसा? की वृत्त-व्यवसायावर ज्यांचं नियंत्रण असतं, त्यांचं मार्गदर्शन वा आदेश त्या सर्वांनाच असतात? आणि त्यांच्यावर कुणी टीका करू शकत नाही, किंवा काही एका अर्थानं त्यांना सदैव संरक्षण मिळतं का?
अर्थात, सोपं असल्यानं हिंदूंची निंदा कुणीही करू शकतोच. योगी आदित्यनाथांना उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्रिपदावर नियुक्त केल्याबद्दल जेव्हा मी न्यू यॉर्क टाइम्ससारख्या मोठ्या परदेशी वृत्तपत्रातील लेख जेव्हा नुकतेच मी वाचले, तेव्हा मला कमालीचा धक्का बसला. २०१४साली मोदींना प्रचंड विजय मिळाला तेव्हा सर्वच माध्यमं केवढी बिथरली होती? त्याचं सार असं: आतासुद्धा योगी आदित्यनाथांना उ.प्र.चे मुख्यमंत्री केलं तेव्हा मोदींनी आपण हिंदू मूलतत्त्ववादी असल्याचा आपला खरा चेहरा दाखवल्याचा आणि भारताला हिंदुराष्ट्र म्हणून पुढं आणण्याचा आपला खरा मानस असल्याचा साक्षात्कार त्या सर्वांना झाला. आणि मग अल्पसंख्यांकांना आता कुणी वाली नसल्याबद्दलही त्यांची खात्रीच झाली, म्हणाना. त्या सर्व लेखांतून मला असत्याचा संचार आणि अतर्क्य निष्कर्षांचा भडिमार दिसून आला. उदाहरणार्थ, स्विस NZZ नं लिहिलं, “मोदींनी योगी आदित्यनाथांची उ.प्र. च्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली असल्यानं आता ते स्वतःला सर्व भारतीयांचे प्रतिनिधी म्हणवून घेऊच शकणार नाहीत.”
हिंदुराष्ट्र म्हणजे पराकोटीचं राक्षसी राज्यच असेल, असं चित्र उदारमतवादी असल्य़ाचं ढोंग करणाऱ्या माध्यमांनी उभं केलं आहे. पण, अमेरिका आणि अन्य कित्येक पाश्चात्त्य राष्ट्रं ख्रिश्चन असतात, त्याचं त्यांना काहीच वाटत असल्याचं दिसत नाही. आणि अन्य संप्रदायांतील माणसांबद्दल विकृत निर्बंध संमत करणाऱ्या असंख्य मुस्लीम राष्ट्रांकडे तर त्यांना पाहायचंच नसतं. पण मग त्यांना हिंदुराष्ट्र का नको असतं? ते काही उलगडा करणार नाहीत. हिंदुराष्ट्रात अल्पसंख्यांचा छळ होईल असं चित्र उभं करायचाच त्यांचा डाव असतो. पण तसं का? आणि कशाकरता?
कित्येक ख्रिस्ती आणि मुस्लीम राष्ट्रांत यहुदी आणि हिंदु अल्पसंख्यांकांचा अतोनात छळ झाल्यामुळं ते ह्या निष्कर्षावर आले असणं शक्य आहे. तरी ती राष्ट्रं त्या अत्याचारांवर पडदाच टाकीत असतात, बरं का. काही झालं तरी हा निष्कर्ष मुळातच चुकीचा आहे. कारण, हिंदूंची मनोवृत्तीच ह्या सर्वांहून भिन्न आहे. अन्य कुठल्याही, अगदी विरोधीसुद्धा, दृष्टिकोनाचा विचार करायला ते सदैव तत्पर असतात. तरीही तथाकथित चांगले ख्रिस्ती आणि मुस्लीमसुद्धा ज्या तत्त्वांवर आपली स्वतःची श्रद्धा आहे, तिच्यावर सर्वानी विश्वास ठेवायलाच हवा असं म्हणत असतातच. आणि तसं करायला कुणाचा नकार असेल तर त्याला फसवून किंवा त्याच्यावर सक्ती करून भाग पाडायलाही त्यांची आडकाठी नसते, बरं का!
हिंदूंची अशी कोंडी करणं सुतराम अनुचित आहे. जीवनाचं ध्येय गाठण्याकरता कैक भिन्न भिन्न मार्ग असतात. आणि तसं पाहिलं तर हिंदूंतही कित्येक अल्पसंख्य समाज आहेत. तरीही त्या सर्वांच्या विचारांचा आधार वैदिक तत्त्वंच आहेत. सर्वांच्या मते जरी ते विविध नावांनी ओळखलं जात असलं तरी अंतिमतः ते एकच तत्त्व सर्वांना व्यापून असतं. प्रत्येक मानवाचा आत्मा त्याच एका ब्रह्माचा आविष्कार असतो. त्याचा साक्षात्कार होणं आणि “सत्यं वद, धर्मं चर,” ह्या वेदाज्ञांचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तद्वतच आपण कोण त्याचा शोध घेणं, त्या मूलतत्त्वापेक्षा आपण वेगळे नसल्याचं उमगणं, आणि सर्वच प्राणिमात्राशी आपण एकरूपच आहोत ह्याची जाणीव होणं, हेच सर्वांच्या जीवनाचं उद्दिष्ट होय.
हिंदू जगातील सर्वांनाच आपले बंधुभगिनी मानतात ते हिंदु धर्मामुळंच, असं ह्यावरून कळून येतं. त्यांना आपल्या धर्मपालनामुळं निसर्गाचा आदर करण्याचीच प्रेरणा मिळते आणि अकारण कुणा प्राण्याला हानी पोचवू नये. हे जाणवतं.
देवानं निवडलेले स्वतःचे लाडके आणि इतर सर्व नावडते असं जे वर्गीकरण ख्रिस्ती आणि मुस्लीम संप्रदाय करीत असतात, तसं हिंदु कधीच करीत नाहीत. अहिंदूंचा तिरस्कार करायला हिंदु बालकांना कधीच शिकवलं जात नाही. उलट, आपल्या खऱ्या धर्मात जे यायला सिद्ध नसतात ते लोक देवाला आवडत नाहीत, असं ख्रिस्ती आणि मुस्लीम संप्रदायांतील बालकांना शिकवण्यात येतं.
इतरांशी तुलना करता मनुष्येतर प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा हिंदु अधिक दयाळु असतात. जगातील समस्त शाकाहारी लोकांत प्रामुख्यानं हिंदूच अधिक आढळतात.
धर्मप्रसाराकरता मुस्लीम करतात तसला जिहाद किंवा ख्रिस्ती करतात तसलं क्रुसेड, असली हिंदूंनी युद्धं कधीच केली नाहीत. खरं तर तसं करण्याची त्यांनी आवश्यकताच वाटत नाही. त्यांनी आपल्या ऋजु वर्तनातूनच आशियात धर्मप्रसार केला. तरीही, गेली सहस्रांहून अधिक वर्षं जिहाद आणि बाटवाबाटवीमुळं कोट्यवधी हिंदूंना केवळ ते हिंदु असल्यानं क्रूर छळ सोसावा लागला आणि मृत्यूही पत्करावा लागला.
हिंदू अशा परिस्थितीतही आपल्या परंपरांना धरून राहिले, कसल्याही दबावाला बळी पडले नाहीत आणि ख्रिस्ती व मुस्लीम करतत तसा. आम्हालाच काय ते खरं सत्य कळलं आहे, असला अतर्क्य दावाही त्यांनी अंधळेपणं कधीच केला नाही, ही दुर्मिळ बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
मग हिंदुमूलतत्त्वदाचा खोटानाटा बाऊ करून भावी हिंदुराष्ट्राच्या नावानं ही माध्यमं अकारण जगभर का कोकलत असतात? मूलतत्त्ववादात काहीच चुकीचं नाही. पण, एक महत्त्वाचा भेद आहे. हिंदु तत्त्वांच्या मते देव सर्वांच्यात असतो. आणि सगळेच दैवी अंश असतात. पण, ख्रिस्ती आणि मुस्लीमांचा देव नेहमीच आपपरभाव बाळगतो.
देवत्वाच्या कल्पनाही भिन्न आहेत. हिंदूंचा देव म्हणजे सत्-चित-आनंद. आणि कित्येक देव तर इष्ट ध्येयप्राप्तीकरता साधकांना साह्यही करतात. ख्रिस्ती आणि मुस्लीमांचे देव व्यक्तिव्यक्तींत भेदभाव करतात. त्यांचा सर्वश्रेष्ठ देव अन्य देवतांचा द्वेष करतो. कुणीही अन्य देवाला भजता कामा नये, अशी ख्रिस्ताची मुळी पहिलीच आज्ञा आहे. आणि मुस्लीमांच्या देवाचाही इतर देवांची भक्ती करायला तीव्र विरोधच असतो. वर पुन्हा आमचाच देव खरा आहे, असाही ह्या दोघांचाही न पटणारा दावा असतोच.
प्रत्यक्षात मात्र, हिंदूंचंच म्हणणं सत्याच्या सर्वांत जवळ जाणारं आहे. वेदांचं पहिलं भाषांतर जेव्हा पाश्चात्त्यांना पाह्यला मिळालं तेव्हा मोठमोठे पाश्चात्त्य विद्वान हिंदूंच्या त्या विचारवैभवानं पराकोटीचे भारावून गेले. नंतर ते वैभव कित्येक वैज्ञानिकांच्याही पाहण्यात आलं. तेव्हा त्याचा उपयोग त्यांनी विज्ञानाच्या कक्षा आणखी विस्तारण्याकरता केला. सर्व ऊर्जा एकच होत हे हिंदु ऋषींचं म्हणणं वेदांत पाश्चात्त्य देशांत पोचल्याच्या परिणामातूनच निर्माण झालं. आणि हिंदूंचं तत्त्वं जसजसं सर्वसामान्य पाश्चात्त्य जनतेपर्यंत झिरपत गेलं, तसतसा चर्चची युरोपीय समाजावरील पकड सुटत गेली.
पण, पाश्चात्त्य जगात हिंदूंचं तत्त्वज्ञान अशा प्रकारानं मूळ धरत असताना जागतिक माध्यमांनाच इतकी चिंता करण्याचं कारणच काय? तिथं आज संस्कृतसारखी जगातली सर्वांत परिणूर्ण, भव्य, प्रभावी आणि नासाला उपयुक्त वाटलेली भाषाही शिकवली जाते. शरीराचं आरोग्य टिकवणारा, मनाच्या विचाराला खोलवर नेऊ शकणारा आणि जीवनाच्या अंतिम सत्याप्रत नेऊ शकणारा योगही तिथल्या शाळांतून प्रत्यक्षात आणला जातो. न्यूक्लिअर भौतिकीच्या आधुनिक संशोधनाला प्रेरणा देणाऱ्या वैदिक तत्त्वज्ञानाचाही तिथं सखोल अभ्यास होतो. महाभारत आणि रामायणातील महान विचारांनी पाश्चात्त्य दिपून जातात, शाळकरी बालकं हमप्टीडम्प्टीऐवजी आज सर्वे%त्र सुखिनः सन्तु असं प्रार्थनेत प्रतिदिन म्हणत असतात. मग हेच चिंतेचा एवढा नसता उपद्व्याप कशाकरता करीत आहेत?
देशाच्या हिंदु रूपाचं संवर्धन केलं पाहिजे, किंवा त्या प्राचीन परंपरांकडे वळलं पाहिजे असं कुणी हिंदूनं सुचवलं रे सुचवलं की लागलीच “हिंदु मूलतत्त्ववादी देशाला हिंदुत्वाकडे ढकलीत आहेत, भारताला ते हिंदु राष्ट्र बनवू इच्छीत आहेत, आणि अल्पसंख्यांकांना वगळायचा प्रयत्न करीत आहेत,” असं आकांडतांडव सर्व माध्यमं का करीत असतात? गंमत म्हणजे हिंदु ही एक भौगोलिक संज्ञाच आहे. इंडियन हा शब्दही त्यापासूनच बनला आहे. सिंधु नदीच्या पलीकडील, हिमालयापासून दक्षिण सागरापर्यंत पसरलेला समाज म्हणून हिंदु, अशी त्या शब्दाची व्युत्पत्ती आहे.
अशा अवस्थेत, जे भारतीय समाज अलीकडे, अलीकडेच आपला समाज सोडून ख्रिश्चन वा मुस्लीम झाले आहेत त्यांनी आपल्याच पूर्वजांच्या अफाट प्रगतीचा विचार करून पुन्हा आपल्याच समाजात का परत प्रवेश करू नये? खरं तर, कोणत्याही प्रकारच्या सभ्यतेचा उगम हिंदुस्थानातच झाला आहे. तो जगतील संपन्न ज्ञानाचं एक विशाल केंद्रीय पीठ होता. त्यामुळं तो जगभर विख्यात होता, अगदी पायथागोरस धरून सगळेच ग्रीक, ज्ञानग्रहणाकरता भारताकडेच धाव घेत होते. आणि आता तर, इतकी वर्षं (चुकीनं) त्याच्या नावानं ओळखलं जाणारं प्रमेय वास्तवात बोधायनाचंच असल्याचं जगभर मान्यता पावलं आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तथ्य कोपरनिकसच्या आधी सहस्रावधी वर्षं पूर्वी ऋग्वेदात (१०.२२.१४) हिंदु ऋषींनी प्रतिपादलं होतं असं आज विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. त्याला तर ख्रिश्चनांचा आणि मुस्लीमांचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. जगभरातील बालकांनी सर्वे%त्र सुखिनः सन्तु हे संस्कृत स्तोत्र म्हणावं, असं सांगितलं जातं, त्या स्तोत्रालाही त्यांचा आक्षेप असायच कारण नाही. खरं तर असे आक्षेप घेणाऱ्यांच्या विरोधातच माध्यमांनी आरडाओरडा करायला हवा नाही का? पण ते तर, त्याच प्राचीन संस्कृतिसभ्यतांचं पुनरुज्जीवन करू इच्छिणाऱ्यांच्याच विरुद्ध ती इतका कंठशोष करतात. ती का? वास्तविक समाजात फूट पाडणारे तेच असतात, आपल्याच प्राचीन तत्त्वज्ञानातील वसुधैव कुटुम्बकम्। मधील तत्वाला अनुसरून वागणारे तर निश्चितच नव्हेत.
“इतर कुणालाही कसं वगळू नये?” ह्या तत्त्वाचा आदर्श हिंदूच घालून देऊ शकतात. सांप्रदायिक अल्पसंख्यांकांचीही भरभराट हिंदुस्थानाव्यतिरिक्त जगात अन्यत्र कुठं झाली आहे? कुठंही आढळणार नाही. विविधतेतील एकतेचं आणि आपसांतील सुसंवादाचं हे भव्य उदाहरण, खरं तर आज, जगभर वाखाणलं जात असतं. माध्यमातील मंडळींनी डोळे उघडे ठेवून जरा जगात इकडेतिकडे पाहायला हवं आहे. म्हणजे त्यांना सत्य दिसू शकेल.
मग इतरांना तुम्ही दूर करता असा भलता आक्षेप हिंदूंवर का घेतला जातो?
त्याचं कारण, बऱ्याच पाश्चात्त्य देशांना आणि मुस्लीमांनाही हिंदुस्थान कधीच सामर्थ्यवान व्हायला नको आहे, हेच त्याचं कारण असणार. सभ्यतेचा पाळणा प्रभावीपणं जगात इथंच प्रथम हलला, असं सर्वच ज्ञात इतिहास सांगतो. कदाचित, आपल्या प्राचीन संभ्यतेच्या आधारावर हिंदुस्थान जगात पुन्हा बलशाली होऊन जगाच्या शिखरस्थानी जाऊन बसेल, याचीच भीती त्यांना असावी. शिक्षणात अधिक प्रभावी धोरण आखण्याला तीव्र विरोध आणि हिंदु मूलतत्त्ववादाच्या धोक्याचं भूत उभं करणं हेच माध्यमांचं विहित कार्य आहे काय?
“कल्पना करा, हिंदुस्थानाचं हिंदुराष्ट्र होत आहे,” माध्यमं आक्रोश करीत असतात. पण तेच तशी कल्पना करीत नाहीत आणि मूलभूत प्रश्न विचारीत नाहीत. हिंदुराष्ट्राचं रूप कसं असेल त्याची कल्पना त्यांनी केली तर, जगभर सुसंवाद आणि शांतता प्रस्थापित व्हावी, ह्याकरता हिंदुराष्ट्राचा प्रचार करावा, असं मग त्यांनाच वाटू लागेल.
एक दिवस असा येईल. तेव्हा लोकांनाच विक्षिप्त कल्पनांवर आंधळेपणानं विसंबण्याचा कंटाळा येईल आणि ते स्वतःच त्याचा त्याग करतील. विक्षिप्त कल्पनांतून काही भयंकर प्रकरण उद्भवेल, ह्या सांगण्याला ते कंटाळतील तेव्हा जगातील समाज भारतमातेचं ऋण मानतील. कारण तिनंच शाश्वत सुखी आणि अंतिम शांततापूर्ण जीवनाचा मार्ग आम्हाला दाखवला.
Feature Image Credit: aha-svtemple.org